शिवसेनेचं खच्चीकरण झालं, तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - Uddhav Thackeray - Sharad Pawar

पुणे :- विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे. विधानपरिषद पदवीधर-शिक्षक निवडणुकीत सहापैकी शिवसेनेच्या वाट्याला १ जागा आली होती. अमरावती (Amravati) शिक्षक मतदारसंघात शिवसेनेला (Shiv Sena) अपक्ष उमेदवाराने तगडी लढत दिली असून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) पराभवाच्या छायेत दिसत आहेत.यावरुन भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेवर  निशाणा साधला.

पुणे (Pune) आणि नागपूर (Nagpur) पदवीधरची जागा हातून गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालं. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तर पुण्यात आणि नागपुरात अपक्ष उमेदवाराने आणखी काही मतं घेतली असती तर विजय आमचाच झाला असता, असं म्हणत पाटील यांनी आपला पराभव मान्य केला.

ही बातमी पण वाचा : नागपुरात  महाविकास आघाडीचा झेंडा ; भाजपला धक्का 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER