शिवसेना ‘बिनविरोध’ मोठा भाऊ; अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेसला मागे टाकले

CM Uddhav-Aditya Thackeray

मुंबई : राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सध्या निकाल जाहीर होतअसून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार शिवसेनेचा विजयरथ सुसाट निघाला आहे. आतापर्यन्त हाती आलेल्या निकालानुसार शिवसेनेनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर, इचलकरंजीत शिवसेनेनं (Shivsena) अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे.

आतापर्यन्त हाती आलेल्या निकालानुसार शिवसेनेने 278 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप-257, राष्ट्रवादी – 218, काँग्रेस – 124 तर मनसेनेही आपले खाते उघडले असून, 5 ठिकाणी आणि स्थानिक आघाडयांनी 525 ठिकाणी विजय प्राप्त केला आहे.

तुर्तास शिवसेनेकडे जास्त ग्राम पंचायती आहेत. शिवसेनेकडे २७८ तर भाजपाकडे २५७ ग्राम पंचायती आल्या आहेत. यापाठोपाठ राष्टवादीकडे २१८ ग्रामपंचायती तर काँग्रेसकडे १२४ ग्राम पंचायती आल्या आहेत. मनसेकडे ५ ग्राम पंचायती आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER