उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर; बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला केले अभिवादन

Uddhav Thackeray-Tribute-Balasaheb

मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शिवसेना कार्यकर्ते आणि नेते-पदाधिकारी शिवतीर्थावर दाखल होऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील सहकुटुंब बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली . यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी , खासदार संजय राऊत , खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते .

बाळासाहेब नसते तर आज मी जिवंत नसतो : अमिताभ बच्चन

दुपारी १२च्या सुमारास उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच शिवसेना नेते आदित्य ठाकरे हेदेखील तेथे गेले. दरम्यान, यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते शिवतीर्थावर येत असून शिवसेनेचे विजयी आमदारदेखील येणार असल्यामुळे शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर मोठं शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.