
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ज्यांना सन्मान केला त्या व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्रद्रोह का करतेय? असा सवाल भाजपा (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केला आहे .
देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशी सेलिब्रेटिंच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने ‘पॉप डान्स’ केला. तर या परदेशी सेलिब्रेटिंना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्याविरोधात धिंगाणा घातला.
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा प्रचंड सन्मान केला त्या भारतरत्न, महाराष्ट्रभूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय? काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय? सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर ‘ट्रॅक्टर’ फिरवणार का? असे अनेक प्रश्नही शेलार यांनी शिवसेनेला विचारले.
देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशींच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने “पॉप डान्स” केला.
तर या परदेशींना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्या विरोधात हेच धिंगाणा घालतात.
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 6, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला