
मुंबई : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवर(Diesel) कृषी अधिभार लावण्याचा प्रस्ताव आहे. पेट्रोल अडीच आणि डिझेल चार रुपयांनी महागणार आहे. या दरवाढीच्या विरोधात आज शिवसेना (Shivsena)राज्यभर मोर्चे काढणार आहे.
इंधनावरील अबकारी करात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे इंधन स्वत होईल ही अपेक्षा नाही. पेट्रोल व डिझेलचे दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे. यावरून विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.
शिवसेना जिह्याजिह्यात निदर्शने करणार आहे. बैलगाडय़ा, सायकल मार्च काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालये तसेच शासकीय कार्यालयांसमोर ही निदर्शने केली जाणार आहेत.
नाटकं करू नका, कर कमी करा; फडणवीसांची टीका
शिवसेनेच्या या नियोजित आंदोलनावर टीका करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत, शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला