शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढणार – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरेल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन दिली.

राउत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात येत आहोत, असा संदेशही राऊत यांनी ट्विटमध्ये दिला. शेवटी बंगालीत ‘जय हिंद’ची घोषणा त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER