शिवसेना बिहार निवडणूक लढवणार ; संजय राऊत जाणार निवडणूक प्रचारासाठी

गुप्तेश्वर पांडेंविरुद्ध उमेदवार देणार?

Sanjay Raut

मुंबई :  ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे पडघम केव्हाच वाजलेले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात (Bihar Assembly Election 2020) उतरण्याचा निर्णय शिवसेनेने (Shivsena) घेतला आहे. खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनी याची घोषणा केली. शिवसेना बिहारमध्ये 30 ते 40 जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. स्थानिक नेते हे 50 जागांवर निवडणूक लढवावी या मताचे आहेत असंही त्यांनी सांगितले. निवडणुकीत प्रसाचारासाठी जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

एवढेच काय तर, सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त करणारे नुकतेच रिटायर्ड बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्या विरोधात शिवसेना आपला उमेदवार उभा करणार का, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे (Gupteshwat Pandey) यांच्या विरोधात शिवसेना आपला उमेदवार उभा करणार का? यावर बिहारमध्ये गेल्यानंतरच बोलणार, असे राऊत यांनी सांगितले.

राजकीय पटलावर सध्या बिहार निवडणुकीचा विषय चांगलाच चर्चेत आहे. सुशांत सिंहच्या प्रकरणानंतर तर या निवडणुकीवरची चर्चा अधिकच रंगली आहे. निवडणूक ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये असली तरी, बिहारच्या राजकीय रणांगणावर निवडणुकीचे शाब्दिक ढोल सतत वाजत असल्याचे देश पाहतो आहे.

त्यातच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार निवडणूक प्रचाराची धुरा असल्याने महाराष्ट्रासाठी ही निवडणूक अधिक चर्चेचा विषय बनल्याचे पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये शिवसेनेची फारशी ताकद नाही. यावेळी सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा तापलेला असल्याने शिवसेनेच्या निवडणूक लढविण्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना निवडणुकीत उतरल्यानंतर बिहारमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER