कोठेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिलाच नाही, शिवसेनेनं मानले पवारांचे आभार

CM Uddhav Thackeray - Sharad Pawar

मुंबई :- सोलापूर महानगरपालिकेत विरोधीपक्ष नेते महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करत असल्याचं सांगत शिवसेनेला (Shiv Sena) राम राम ठोकला. कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सांगितलं होतं. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून महेश कोठे यांचा प्रवेश झाला अशी पोस्ट देखील आली. मात्र नंतर ती पोस्ट डिलिट करण्यात आली. त्यानंतर महेश कोठे यांचा पक्षप्रवेश झालाच नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहे. त्या पक्षप्रवेशात महेश कोठे यांचे समर्थक असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोठेंना पक्षात न घेतल्याबद्दल शिवसेनेने शरद पवारांचे आभार मानले आहेत.

महेश कोठे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचे काल रात्रीच शिवसेनेकडून सांगण्यात येत होते. कोठे आणि त्यांचे समर्थक हे आज सर्व तयारीनिशी प्रवेशासाठी पोहोचले. पण अचानक हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला. कोठे यांच्या काही समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र महेश कोठे यांचा प्रवेश लांबणीवर गेला.

दुसरीकडे, शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे (Purushottam Barde) यांनी कोठेंना पक्षात न घेतल्याबद्दल शिवसेनेने शरद पवारांचे आभार मानले आहेत. विधानसभा निवडणुकीत कोठेंनी बंडखोरी केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीत्यांची हकालपट्टी केली होती. मात्र निवडणुकीनंतर मातोश्रीवर जाऊनकोठेंनी उद्धव ठाकरे यांची माफी मागितल्याने त्यांना पक्षात कायम ठेवण्यात आले होते. मात्र आता उद्धव ठेकरेंनी त्यांची कायमची हाकलपट्टी केली आहे. तर पवारांनीही त्यांना पक्षात घेतले नाही, यासाठी मी त्यांचे आभार मानतो, अशी माहिती बरडे यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : महेश कोठे गेले, गेले कोठे? – शरद पवारांचे ट्विट डिलिट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER