भाजपाच्या हिंदुत्वाला शिवसेनेने चांगला धडा शिकवला – सुशीलकुमार शिंदे

Sushilkumar Shinde

पुणे : शिवसेना आज ज्या किमान समान कार्यक्रमनुसार सत्तेत आली, तेच हिंदुत्व प्रबोधनकारांना अपेक्षित होते आणि तेच खरे हिंदुत्व आहे. भाजपाच्या हिंदुत्वाला शिवसेनेने (Shivsena) चांगला धडा शिकवला आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे (Congress) नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केले.

ते पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे प्रबोधन शतक महोत्सव आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणालेत, शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाला मुरड घातली असे मला वाटत नाही. कारण, किमान समान कार्यक्रम हा प्रबोधन ठाकरे यांनी वेगळ्या रुपाने आधी मांडला होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनी चांगली साथ देत भाजपाला सत्तेपासून त्यांनी दूर ठेवले आहे. भाजपाच्या हिंदुत्वाला शिवसेनेनं चांगला धडा शिकवला आहे.

पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा आहे, त्या पुण्यात आज प्रबोधनकारांची आणि शिवसेना प्रमुखांची जयंती साजरी होते आहे. ही मोठी ऐतिहासिक घटना आहे, असे असल्याचेही सुशीलकुमार शिंदें म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER