शिवसेना तुमच्या पाठीशी; आदित्य ठाकरेंचा पूरग्रस्तांना दिलासा

Aditya Thackeray

मुंबई :- सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा यात मृत्यू झाला. या साऱ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आणि अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला.

ही बातमी पण वाचा : आता शिवसेनेचा ‘फ्रेंड्स ऑफ आदित्य ठाकरे’ नवा उपक्रम

शिवसेना नेते व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणीकरिता कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर येथील बापट कॅम्प या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी परिस्थितीला घाबरू नका, संपूर्ण शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी आहे, असा दिलासा आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांना दिला. त्यांनी पूरग्रस्तांना पाण्याच्या टाक्या तसेच एक महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले.

तत्पूर्वी आदित्य ठाकरे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. आंबेवाडी चिखली परिसरातील पूरग्रस्तांना भेटून त्यांच्याही व्यथा आदित्य ठाकरेंनी जाणून घेतल्या. पूरग्रस्तांना शिवसेनेकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. मदत करताना व्यक्ती, पक्ष हे महत्त्वाचे नाही. पक्ष, जात-पात, धर्म विसरून पक्षाकडून प्रत्येकाला मदत दिली जाईल. मदतीपासून कोणी वंचित असेल तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगा. आम्ही सर्वोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही आदित्य यांनी पूरग्रस्तांना दिले आहे.

ही बातमी पण वाचा : कोल्हापूरला पुन्हा एकदा उभं करायचय : आदित्य ठाकरे