शिवसेना पवारांच्या पाठीशी खंभीरपणे उभी – एकनाथ शिंदे

Eknath Shinde & Sharad Pawar

मुंबई : काल मुखयमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) येथे दाऊदच्या हस्तकाने धमकीचा फोन केल्याचे उघड झाले होते. मुख्यमंत्र्यांचे वांद्र्यातील खासगी निवासस्थान असलेलं मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी काल देण्यात आली. तर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांंना (Sharad Pawar) धमकी आल्याची माहिती समोर येत असून याबाबत गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी माहिती दिली आहे. हे फोन बाहेरच्या देशातून आले होते अस त्यांच म्हणणं आहे.

यावर आता शिवसेनेचे नेते आणि नागविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दाऊदच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, शरद पवार साहेब यांच्या पाठीशी आम्ही आहोत,’ असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. कंगना राणावतबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की ज्यांना मुंबई शहरानं करियर दिलं आणि ज्यांना मोठं केलं, त्या मुंबई बद्दल असं बोलणं योग्य नाही. लोक याचा विचार करतील.

मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’वर सुद्धा धमकीचा फोन आल्याची माहिती पुढे येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवार यांना धमकीचा फोन काल आला होता. भारताबाहेरून हा फोन आल्याची माहिती आहे. तसेच कंगना रनौत प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील धमकीचे फोन आला. कंगनावर गृहमंत्र्यांनी टिप्पणी केल्यावर हा फोन आला. याबाबत मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER