मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना शिवसेनेत पुन्हा दिली मोठी जबाबदारी

Sanjay Raut-Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे राजकारणात सध्या जास्त सक्रिय असून चर्चेतही आहे . विरोधकांना सळो की पळो सोडणाऱ्या संजय राऊतांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षात मोठी जबाबदारी सोपविली आहे . शिवसेनेने संजय राऊतांना मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये प्रवक्तेपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर इतर सदस्य प्रवक्त्यांमध्ये खासदार अरविंद सावंत, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार निलम गोऱ्हे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापौर किशोरी पेडणेकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुनिल प्रभू यांचीही प्रवक्ते म्हणून घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली आहे. यावेळी राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचीही प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान देशपातळीपासून राज्यातील कोणत्याही प्रश्नावर संजय राऊत यांनी नेहमी पक्षाची भूमिका स्पष्ट करत असतात . इतकचं नाही तर अलीकडे राज्याच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा संजय राऊत यांचाच आहे.

शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?

 • संजय राऊत – राज्यसभा खासदार & मुख्य प्रवक्ते
 • अरविंद सावंत – खासदार (मुंबई)
 • धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)
 • प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
 • डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार
 • गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री
 • अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
 • उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
 • सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
 • प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
 • किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER