
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपकडून मेरा आंगण मेरा रणांगण हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनावरून सत्तेतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेनं भाजपाच्या आंदोलनाला उत्तर दिलं आहे. केंद्र सरकारकडून झालेली दिरंगाईच्या मुद्याकडेही शिवसेनेने भाजपाचे लक्ष वेधले आहे.
भाजपाचे आंदोलन राजकीय नैराश्यातून आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे . शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ट्विट करून केंद्र सरकारकडून झालेल्या दिरंगाईचा समाचार घेतला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवरही त्यांनी टीका केली आहे.
“भाजपाचे आंदोलन राजकीय नैराश्यातून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार सर्व स्तरांवर शिकस्त करत आहे. याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार एकत्र काम करत आहे. जीएसटीचे पैसे केंद्रानं दिले नाहीत. ते त्वरित देण्यात यावेत. पॅकेज जाहीर झालं ते ४० दिवसांनी. अजूनही गाईडलाईन नाहीत. याउलट आरोग्य व जीवनावश्यक सुविधांचा मेळ राज्य सरकारनं घातला. केंद्र सरकारनं स्थलांतरित मजुरांचा विचार २१ मार्चला केला असता वा १ मे रोजी काही धोरणं व पावलं उचलली असती, तर मजुरांची दैना झाली नसती. ” असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
“कधीही आपत्ती व्यवस्थापन कायदा देशभरात लागू झाल्यावर आपत्ती व्यवस्थापन धोरण व आराखडा जाहीर केला जातो, तोही केला गेला नाही. ही दिशाभूल का? मराठीत कळत नसेल, तर गुजरातीतील एक म्हण यांना योग्य आहे. ‘दुखे पेट ने पिटो माथो’ म्हणजेच दुखतंय पोट व हाणतायत डोकं,” असा चिमटा नीलम गोऱ्हे यांनी भाजपा नेत्यांना काढला आहे.
#महाराष्ट्रद्रोहीBJP१ भाजपाचे आंदोलन राजकीय नैराश्यातुन!
*ना.ऊद्धवजी ठाकरे सरकार सर्व स्तरावर शिकस्त करते आहे व या बाबत केंद्रसरकार व राज्यसरकार एकत्र काम करत आहे.
*GSTचे पैसे केंद्राने दिले नाहीत,ते त्वरित देण्यात यावेत.
पँकेज जाहीर झाले ते ४० दिवसांनी!अजूनही गाईडलाईन नाहीत __२— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) May 22, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला