शिवसेनेने मुंबईची तुंबापुरी करून दाखवली; भाजपची टीका

Atul Bhatkhalkar - Shiv Sena

मुंबई : आजपासून मान्सूनने मुंबई शहरासह उपनगरात प्रवेश केला आहे. आज आलेल्या पहिल्याच पावसाने मुंबई शहरातील अनेक भागांत पाणी साचले. त्यामुळे भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकार आणि मुंबई महालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेवर टीका केली. पावसामुळे मुंबईत पाणी साचले आहे. आता राज्य सरकार बहुतेक पावसाची जबाबदारी मोदींवरच ढकलतील, अशी मिस्कील टीका अतुल भातखळकर यांनी केली. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अतुल भातखळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी भातखळकर यांनी मुंबईत साचलेल्या पाण्यावरून राज्य सरकारवर आणि शिवसेनेला लक्ष्य केले. महापालिकेने मुंबईची तुंबापुरी करून दाखवली आहे. नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं आम्ही पूर्वीपासूनच सांगत होतो, ते आज सिद्ध झाले आहे. आता राज्य सरकार बहुतेक पावसाची जबाबदारी पंतप्रधान मोदींवरच ढकलतील. मोदींनीच त्यातून मार्ग काढावा असं त्यांनी म्हणू नये एवढीच आमची अपेक्षा आहे, असा टोला भातखळकर यांनी लगावला.

महापालिकेतील भ्रष्टाचार कमी करून नालेसफाई नीट करा. जे पाणी तुंबण्याचे स्पॉट आहेत त्या ठिकाणी तत्काळ कार्यवाही करा, असा आमचा महापालिका आयुक्तांना सल्ला राहील, असंही ते म्हणाले. दरम्यान, आजच्या बैठकीला आमचे नेते बी. एल. संतोष, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. पंतप्रधानांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. शेवटच्या नागरिकाला ही लस मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी आमचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी कॅम्प लावण्यात येणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुलं अनाथ झाली. किती मुले अनाथ झालीत याचा आढावा घेण्यात आला असून त्यांना मदत देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती भातखळकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button