आता तरी शिवसेनेनं आपली इज्जत वाचवावी; पश्चिम बंगाल निवडणूक लढवण्यावरून देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने जवळपास सर्वच जागी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. निवडणुकीच्या निकालात सकाळच्या सत्रात आम्ही मोठे भाऊ म्हणून मिरवू पाहणाऱ्या शिवसेनेला दुपारनंतर उतरत्या क्रमावर यावं लागलं आणि पुन्हा भाजपच मोठा भाऊ ठरला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीकास्त्र सोडले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मागे टाकून भाजपच सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

विधान परिषद निवडणुकीतील पराभव हा तात्पुरता होता. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांची राजकीय स्पेस कमी झाली आहे. ही स्पेस भाजपने व्यापल्यामुळे आमच्या पक्षाचा या निवडणुकीत विस्तारच झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पश्चिम बंगाल निवडणूक शिवसेनेनं लढवण्याची घोषणा केलीय. त्यावरून आता राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यानंतर शिवसेनेला अक्कल आली पाहिजे होती.

मात्र, आता पुन्हा ते पश्चिम बंगालमध्ये उमेदवार उभे करत आहेत. तेथेदेखील हीच गत होईल. किमान आता तरी शिवसेनेनं आपली इज्जत आपणच राखावी, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये (Gram panchayat election results 2021) भाजपने राज्यातील सर्वच भागांमध्ये यश मिळवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला मागे टाकून भाजपच सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER