… शिवसेनेने काँग्रेसला शहाणपण शिकवण्याऐवजी तोंड बंद ठेवावे – संजय निरुपम यांचा टोमणा

sanjay Nirupam & Sanjay Raut

मुंबई : काँग्रेसने चांगली कामगिरी केली असती तर तेजस्वी आत्तापर्यंत मुख्यमंत्री झाला असता असे सूचक वक्तव्य करत शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसला टोमणा मारला. राऊतांच्या या टोमण्याला काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी राऊतांचे त्यांचं नाव न उत्तर दिले – काँग्रेसला शहाणपण शिकवण्याऐवजी शिवसेनेने तोंड बंद ठेवाव.

संजय निरुपम म्हणाले, शिवसेनेने बिहारमध्ये २२ जागांवर निवडणूक लढवली. त्यातल्या २१ जागांवर त्यांना ‘नोटा’पेक्षाही कमी मत मिळाल्याच ऐकल आहे. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसला शहाणपण शिकवण्याऐवजी तोंड बंद ठेवाव.

बिहारमध्ये जे निकाल हाती येत आहेत त्यात काँग्रेसची कामगिरी ही फारशी झालेली नाही. त्यावरून राऊतांनी काँग्रेसला टोला लगावला होता.

संजय राऊत म्हणाले होते – बिहारचे सर्व निकाल अजून आलेले नाहीत. नितीशकुमार तिसऱ्या नंबरवर आहेत. मुख्यमंत्रिपदी तीन वेळा राहूनही त्यांची पार्टी तीन नंबरवर जात असेल तर विचार करण्याची वेळ आली आहे. सरकार ‘फेल’ गेले आहे. जर काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर आतापर्यंत तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER