शिवसेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा; संजय राऊत यांचा निर्धार

उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत नेऊ

Sanjay Raut

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिल्लीपर्यंत घेऊन जायचे आहे. आपला पंतप्रधान व्हायला हवा, अशा निर्धार शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोलून दाखवला, ते विक्रोळीत एका उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

राऊत म्हणालेत, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घडवले आहे, हा साचा वेगळाच असून, तो कुठेही मिळणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील ही शिवसेना देशामध्ये अजिंक्य आहे हे लक्षात ठेवा. म्हणूनच १०५ आमदार घरी बसवले, आता त्यांचे १०५ ठीक आहेत, पण पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे १०५ आमदार असतील.

कारशेड कांजूरलाच होणार

मेट्रोचे कारशेड कांजूरलाच होणार, असे संजय राऊतांनी ठणकावून सांगितले. तुम्ही काही करा, कोणी कितीही अडथळे आणा, कोर्टाने काहीही आदेश देऊ द्या. कांजूरचे योगदान मेट्रोसाठी वेगळे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER