आमच्या रक्तामध्ये हिंदूत्व असल्याचं सांगणाऱ्या शिवसेनेने अन्सारींना उत्तर द्यावे – मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar

नागपूर :- हमिद अन्सारी ( Hamid Ansari) यांनी हिंदूत्ववाद लक्षात घेऊन विधान करणे गरजेचे होते. त्यांनी उपराष्ट्रपतीपद भूषविले आहे. त्यामुळे असे वक्तव्य करणे त्यांच्या त्या पदाला शोभा देत नाही. आता हिंदूत्ववाद कोरोनापेक्षा वाईट आहे, की असा कट्टरवाद कोरोनापेक्षा वाईट आहे, हे जनता ठरवेल. मात्र, रोज सकाळी उठून आमच्या रक्तामध्ये हिंदूत्व आहे म्हणणाऱ्यांनी याचे उत्तर द्यायला पाहिजे, असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेला टोला लगावला. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी ते नागपुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

हमिद अन्सारी यांनी उपराष्ट्रपती हे मोठे पद भूषविले आहे. त्यांच्याऐवजी कोणी असे वक्तव्य केले असते, तर त्यांना तसे उत्तर देता आले असते. मात्र, त्यांच्या पदाचा मान आम्ही ठेवतो. यापूर्वीही त्यांनी ‘मी आरती करणार नाही’, असे म्हटले होते. त्यांच्या पदाला असे वक्तव्य शोभत नाही. आमचे हिंदूत्व सर्वसमावेशक आहे. सहिष्णुता आमच्या रक्तात आहे. मानवतेचा धर्म म्हणजे हिंदूत्व आहे. मात्र, आतंकी भावनेनी कोणी या देशाचे नुकसान करत असेल तर मग ‘जय भवानी-जय शिवाजी’, असेही मुनगंटीवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : कोरोनाआधी देश धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त : हमिद अन्सारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER