शिवसेना म्हणते…, ‘नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा’

gulabrao patil & eknath shinde

मुंबई : ‘नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा’, असं आवाहन जळगावाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना केले आहे (Gulabrao Patil on Eknath Khadse).

मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप करताना दिसत आहेत. पण, एकनाथ खडसे आरोप करतात आणि गप्प बसतात. असे व्हायला नको. नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा’, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.

मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या विरुद्ध आवाज उठवला आहे. त्यातच, त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंज-यात ठेवलं आहे.

‘माझ्यावर जी मीडिया ट्रायल झाली होती ,ते या बारभाई कारस्थानतूनच झाली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच माझे तिकीट कापले. सर्व कटकारस्थान यांचेच आहे. मी सर्व बाबी नानासाहेब फडणवीस यांचे बारभाई कारस्थान या पुस्तकात देणार आहे’, असं एकनाथ खडसे म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER