समझनेवाले को इशारा काफी है! संजय राऊतांचे टीकास्त्र

Sanjay Raut

मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) नवे समन्य बजावले आहेत. आता वर्षा राऊत यांना 5 जानेवारीला ED समोर हजर व्हावे लागणार आहे. यावरून राजकीय वर्तुळात वातावरण चांगलेच तापले असून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे .

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून समझनेवाले को इशारा काफी है! असं सांगत भाजप नेत्यांना ओपन चॅलेंज दिले आहे.

अचानक गोदी मीडियामधील कमळे फुलायला लागली आहेत. खास करून माझ्या कुटुंबाला ED ची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यावर. जनतेला माहीत आहे, की राजकीय पोपट कसे राजकीय हेतूसाठी वापरले जातात. माझ्या कुटुंबाचं नाव PMC आणि HDIL स्कॅममध्ये विनाकरण गोवण्यात आल आहे. मी आव्हान देतो की पुराव्यानिशी ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर करवाईला तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है!’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER