दसरा मेळाव्याचे उद्धव ठाकरेंचे भाषण व्यासपीठावरूनच ; संजय राऊतांची माहिती

dussehra-rally.jpg

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona Crises) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी होऊ नये, याची प्रशासनाकडून खबरदारीही घेतली जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं विधान केलं आहे. दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दसरा मेळावा घेण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण व्यासपीठावरूनच होईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. दसरा मेळाव्याचं महत्त्व राजकीय आणि सांस्कृतिकदेखील आहे. त्यामुळे दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होईल. नियम आणि आरोग्याच्या दृष्टीनं योग्य होईल, अशा पद्धतीनं नियोजन केलं जाईल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER