राष्ट्रवादीच्या आमदाराला सत्तेची मस्ती, पुढच्या वेळी शिवसेना त्यांना पाडणार; संजय राऊत भडकले

Sanjay Raut - Dilip Mohite Patil

रत्नागिरी : खेड पंचायत समिती (Khed Panchayat Samiti) सदस्यांच्या फोडाफोडीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे राष्ट्रवादीच्या आमदारावर चांगलेच भडकले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा कारभार सुरळीत सुरू असताना खेडमध्ये जे घाणेरडे राजकारण सुरू आहे, जे खेडमध्ये घडून आले; त्याचे खापर आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांचे-आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील.

तसेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत. पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बंदोबस्त पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करावा, नाही तर शिवसेनेकडे हा विषय सोपवावा, असा इशाराच राऊत यांनी देऊन टाकला. खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीत वाद निर्माण झाला आहे. खेडचे विद्यमान आमदार हे शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी लायक नाहीत. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. अजितदादांनी सांगूनसुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला सत्तेचा माज आला आहे, असंच म्हणावं लागेल. राज्यात थोडीफार सत्ता आहे, म्हणून जास्तीचा माज करू नका, शिवसेना उत्तर देईल. पंचायत समितीच्या सदस्यांना पळवून नेलं, दहशतीनं पळवून नेलं. त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत हा विषय नेला जाईल; पण हे राजकारण घाणेरडं आहे. पंचायत समिचीचा विषय आमच्यासाठी संपला. शिवसेनेने बांगड्या घातलेल्या नाही. आम्हीही माणसं फोडू शकतो. पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे आम्ही तसं काम करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे.

आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर आम्ही काय करायचं हे आम्ही पाहू. दिलीप मोहिते यांची वागणूक अशीच असेल तर महाविकास आघाडी असो की नसो, इथे शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते हे माजी आमदार होईल. आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही काय करू शकतो हे दाखवून देऊ. यांना पाडून शिवसेनेचा आमदार निवडून येईल, हा इशारा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी शिवसेनेच्या वाघाच्या शेपटावर पाय ठेवलाय, अशा शब्दात संजय राऊत यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button