राजीव, तू हे काय केलेस, तुझं असे जाणे भयंकर वेदनादायक ; संजय राऊत भावूक

Maharashtra Today

मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajeev satav) यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर त्यांच्या निधनानंतर देशभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजीव सातव तू हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे. चार दिवसापूर्वीच व्हिडीओ कॉलवर आपण नि:शब्द हाय, हॅलो केले. लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे. तुला कोणत्या शब्दात श्रध्दांजली वाहू?, असे संजय राऊत(SAnjay Raut) यांनी म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button