
मुंबई :- राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासूनच तीन पक्षाचं सरकार कंस चालतं याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. तर दुसरी बाजू म्हणजे, स्थानिक नेत्यांमध्ये एकमेंकांच्या पक्षाप्रती जी कडवी भावना होती. कडवा विरोध होता तो मिटेल का याकडेही अनेकजण लक्ष ठेवून आहेत. काही वेळेस काही ठिकाणी स्थानिकांना एकमेंकांच्या गळ्यात गळा टाकानाही राज्याने पाहिले आहे. मात्र, जिथे पक्ष महत्त्वाकांक्षा किंवा स्थानिक नेत्यांच त्या ठिकाणी वजन पाहता घटक पक्षांतील नेत्यांत मोठे मतभेदही दिसून येत आहेत.
विधान परिषदेच्या ५ जागा महाविकास आघाडीने एकत्रित लढल्या त्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुकाही एकत्रित लढण्यासाठी इच्छुक आहे. परंतु, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. यातच काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात जागावाटपावरूनही तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिकेत एकूण १११ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. यातच जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यास शिवसेनेने नकार दिला आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, यात महाविकास आघाडीऐवजी स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत धुसफूस झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ही बातमी पण वाचा : दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले, सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदललले ; शिवसेनेच्या नेत्याची राणेंवर टीका
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला