
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढणार असतील तर शिवसेना का गप्प बसेल, शिवसेना ही स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार श्री. उदय सामंत (Uday Samant) यांनी केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून साकारल्या गेलेल्या गांधी मैदान येथील मल्टी स्पोर्ट्स टर्फ क्रीडांगणाचे सामंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला