नवाब मालिकांचे आरोप शिवसेनेने फेटाळले ; खासदार राहुल शेवाळे म्हणाले केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वोतपरी मदत

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नबाब मलिक (Nawab Malik) यांनी केंद्र सरकारविरोधात आरोप करून राजकारण सुरू केले आहे. मात्र, शिवसेनेनेच मलिक यांच्या आरोपांना नाकारले आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करत आहे, असे शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे (Rahul Shewale) यांनी म्हटले आहे.

रेमेडिसीव्हर इंजेक्शन बनविणाऱ्या कंपन्यांनी महाराष्ट्राला हे इंजेक्शन विकू नये यासाठी केंद्राने दबाव आणला असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र, शेवाळे यांनी मलिक यांचे आरोप हे त्यांचे वैयक्तिक आहेत. सरकारची भूकिा नाही, असे म्हटले आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकार कोरोनाविरुध्द लढण्यासाठी हातात हात घालून काम करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button