शिवसेनेकडून भाजपला खिंडार, जळगावातील ३ नगरसेवक गळाला, तर ११ नगरसेवक वाटेवर

मुंबई : शिवसेनेने भाजपामध्ये आणखी एक जबर धक्का देत खिंडार पाडले आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकेतील ५ भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता आणखी तीन नगरसेवकांनी आपल्या हाती शिवबंधन बांधून शिवसेनेचा झेंडा आपल्या हाती घेतला आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या भाजपच्या नगरसेवकांना आपल्या गळाला लावले आहे. हा भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे एकूण ५७ नगरसेवक होते. त्यापैकी एकूण ३० नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता आणखी ११ नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ५७ नगरसेवकांसह भाजपकडे बहुमत होते. मात्र, आता ३० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच आणखी ११ नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास भाजपकडे आता केवळ १६ नगरसेवक शिल्लक राहतील. दोन दिवसांपूर्वी जळगाव मनपातील एकूण सात नगरसेवकांनी गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल होत शिवसेनेत प्रवेश केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button