नरेंद्र + देवेंद्र = वसुली केंद्र; इंधन दरवाढीच्या निषेधात शिवसेनेच्या घोषणा

मुंबई :- कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांचे निर्माण आणि विकास करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर कृषी अधिभार लावण्याची घोषणा केली. आधीच पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. याविरोधात आज मुंबईत शिवसेनेने (Shivsena) आंदोलन केले. ‘केंद्र सरकार तुपाशी, ग्राहक मात्र उपाशी, नरेंद्र (Narendra Modi) + देवेंद्र (Devendra Fadnavis) = वसुली केंद्र, अब कि बार पेट्रोल १०० पार’ अशा घोषणा दिल्यात.

काही निदर्शक डोक्यावर गॅस सिलेंडर घेऊन आले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER