बेस्ट अध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेचाच झेंडा

Praveen Shinde

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) बेस्ट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा झेंडा फडकवला आहे. बेस्ट अध्यक्षपदी शिवसेनेचे प्रवीण शिंदे (Praveen Shinde) विजयी झाले. निवडणुकीत काँग्रेस तटस्थ राहिल्याने शिवसेनेसाठी विजयाचे मार्ग मोकळे झाले.

बेस्ट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रवीण शिंदे यांना आठ मते मिळाली, तर भाजपच्या प्रकाश गंगाधरे यांना पाच मते मिळाली. बीएमसीचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अर्ज मागे घेतला. दरम्यान बेस्ट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या सह्यांचा गोंधळ झाला. चुकीच्या जागी सही केल्यामुळे मतदानात उमेदवारांचीच दोन मतं अवैध ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER