शिवसेना गावागावांत पोहचवा; उद्धव ठाकरेंचे पॉवरफुल आदेश

CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना (SHivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पक्षविस्तारासाठी कंबर कसली आहे. त्यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेनेची पॉवरफुल बैठक झाली. राज्यभर शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात येणार आहे. गावोगावी शिवसेना पोहचवण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहेत, अशी माहिती शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी बैठकीनंतर दिली.

राज्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाची चर्चा या बैठकीत पार पडली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं घवघवीत यश मिळवलंय. आता राज्यातील पाच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी शिवसेनेची रणनीती या बैठकीत ठरू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER