शिवसेना पक्ष सत्तेत आहे, सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहचवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Uddhav Thackeray

मुंबई : आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व शिवसेना (Shiv Sena meeting) संपर्कप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. शिवसेना महाराष्ट्रातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढवणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होत आहे.

तब्बल ३४ जिल्ह्यांतील १४ हजार २३४ गावांत ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. सर्व ग्रामपंचायतीत शिवसेनेनं त्यांच्या संपर्कप्रमुखांना रणनीती आखून सतर्क केलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी “शिवसेना पक्ष हा आता सत्तेत आहे. त्यामुळे सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहचवा” असे आदेश संपर्कप्रमुखांना दिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना (Shivsena) हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे, त्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरा, असे आदेश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत.

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना त्यांनी पूर्ण ताकद लावण्यास सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोमाने काम करा, लोकोपयोगी कामं करून जनतेचा विश्वास संपादन करा, संपर्कमंत्री आणि पालकमंत्र्यांशी समन्वय राखा आणि एकजुटीने निवडणुकांना तोंड द्या, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती (Maharashtra Gram Panchayat election) आखत आहेत. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER