अभिमन्यू काळेंच्या बदलीला शिवसेनेतूनच विरोध, शिवाजी आढळरावांचे थेट ठाकरे सरकारला चॅलेंज

Maharashtra Today

मुंबई : राज्यात वाढत असलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे रेमडेसिवीर इंजक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून राज्यात काही दिवसांपासून जोरदार राजकारण रंगलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची मंगळवारी २० एप्रिलला तडकाफडकी बदली केली. मात्र काळे यांच्या बदलीवरुन आता शिवसेनेतूनच नाराजीचे सूर ऐकायला मिळत आहे. शिवसेनेचे उपनेते माजी खाजदार शिवाजी आढळराव पाटील( Shivaji Adhalrao Patil) यांनी काळेंच्या बदलीवरुन थेट ठाकरे सरकारला(Thackeray government) आव्हान दिले आहे. अभिमन्यू काळे (Abhimanyu Kale) यांची बदली अतिशय चुकीची आणि निषेधार्ह आहे, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर आपलं म्हणणं मांडत नाराजी व्यक्त केली आहे. ‘अभिमन्यू काळे यांना मी जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहित नजरेसमोर ठेवून, त्यांनी आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरं जावं लागलं आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एका प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या तडकाफडकी बदलीला माझा ठाम विरोध आहे. जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्याला माझा जाहीर पाठिंबा आहे, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त अभिमन्यू काळे यांची २० तारखेला तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी परिमल सिंग यांच्याकडे एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात अपयश आल्याच्या कारणावरून ही बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button