नाशिकमध्ये सिंगल वॉर्ड पद्धतीला शिवसेनेचा विरोध, भगवा न फडकण्याची भीती

Nashik Municipal Corporation - Shiv Sena

नाशिक : नाशिकमध्ये माहनगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) निवडणुकीमुळे राजकीय वातावरणत तापलं आहे. पालिकेच्या निवडणुकीत एकसदस्यीय प्रभाग पद्धतीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. नाशिकच्या शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे धाव घेत द्विसदस्यीप प्रभाग रचनेचा असावी अशी मागणी केली आहे. एकसदस्यीय प्रभाग पद्धत शिवसेनेला महापालिकेवर भगवा फडकवण्यास अडथळा आणू शकते अशी भीती शिवसेना पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य स्तरावर आघाडीचे नेते कितीही सगळ्या निवडणुका एकत्र लढण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात बोलत असले तरीसुद्धा स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांच्याविरोधात जोर बैठका काढताना दिसून येत आहेत. नाशिकमध्ये काल शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) अशा तिनही पक्षांच्या स्वतंत्र बैठका झाल्या आणि तिन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या भावना डालवून आघाडी एकत्र लढण्याचा निर्णय कसा घेणार याकडेही लक्ष लागलं आहे. .

दरम्यान, नाशिक पालिकेची जबाबदारी खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडे आहे. गेल्या काही काळापासून ते नाशिकचे दौरेही करताना दिसून आले. त्यांनीही शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचेच संकेत दिलेत. एवढच नाही तर नाशिकला शिवसेनेचा बालेकिल्ला करा असं आवाहनही राऊतांनी केलं. तर दुसरीकडे भाजपानेही कंबर कसत बाळासाहेब सानपांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला. ते शिवसेनेतून भाजपात (BJP) गेल्यामुळे काही समिकरणं बदलतात का तेही महत्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER