शिवसेना मदतीसाठी रस्त्यावर ;  ऐन वादळात दोन दिवसांपासून मदतकार्य सुरू   

Maharashtra Today

मुंबई :- तौक्ते चक्रीवादळामुळे (Tauktae cyclone) मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी थैमान घातले आहे. या संकटमय काळात मुंबईकरांच्या मदतीसाठी शिवसेनेचे (Shivsena)अनेक कार्यकर्ते पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे सरसावले. अनेक कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून गेल्या दोन दिवसांपासून मदतकार्य सुरू ठेवल्याचे चित्र मुंबईत ठिकठिकाणी दिसले.

दहिसर येथील प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद हे थेट रस्त्यावर उतरले. ब्रीद यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह विभागातील विविध ठिकाणी फिरून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. स्थानिक नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तहसीलदार, तलाठी प्रफुल्ल इंगळे यांच्या मार्फत कार्यालयातून नागरिकांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.

तर माझ्या प्रभागातील नागरिकांना घरात सुरक्षित राहता यावे यासाठी मी आणि माझे कार्यकर्ते आमचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरून काम करत असल्याचे ब्रीद यांनी यावेळी सांगितले.

तर दुसरीकडे शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे आणि पी/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा व स्थानिक नगरसेविका संगीता संजय सुतार यांनी थेट मढ कोळीवाडा गाठला. या चक्रीवादळच्या मढ बंदरात सुखरूप नांगरून ठेवलेल्या 25 ते 30 पारंपरिक मासेमारी नौकांचे नागरांचे दोर तुटून नौकांचे झालेल्या नुकसानीचे पाहणी केली. त्याबरोबरच मत्स्यव्यवसाय खात्याचे परवाने अधिकारी अशोक जावळे यांना युद्धपातळीवर पंचनामे करण्याची सूचना केली. तर यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त अर्थिक मदत मिळवून देऊ, असे आश्वासन दिले आहे.

ही बातमी पण वाचा : अस्मानी आणि सुलतानी संकटे नवीन नाहीत, तौत्केच्या संकटातूनही महाराष्ट्र यशस्वी मार्ग काढेलच ; शिवसेनेचा विश्वास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button