सानपांच्या ‘घरवापसी’नंतर शिवसेनेचाही पक्षप्रवेशाचा धडाका! शिवसेनेत आज मेगाभरती

Balasaheb Sanap-Shivsena

नाशिक : बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेकडूनही  (Shivsena) पक्षप्रवेशाचा धडाका सुरु करण्यात आलाय. नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून भाजपचे (BJP) शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दुपारी 3 वाजता शिवसेना भवन इथं हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. त्यामुळे सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ही बातमी पण वाचा:- बाळासाहेब सानपांच्या प्रवेशानं भाजपची डोकेदुखी वाढली! अनेक नगरसेवक रामराम ठोकणार?

बाळासाहेब सानप यांनी दोन वर्षात तीन पक्ष बदलले. मग अशा व्यक्तीला पक्षात प्रवेश का दिला जातोय? असा सवाल भाजपमधील एका गटाकडून विचारला जात होता. मात्र, त्यानंतरही सोमवारी मुंबईत सानप यांचा प्रवेश सोहळा पार पडला. त्यानंतर आता नाशिक भाजपात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक नगरसेवक नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे नाराज नगरसेवक पक्षाला राम-राम ठोकण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठा गृहकलह निर्माण होण्याचे संकेत पाहायला मिळत आहेत.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले –

एका विचार आणि ध्येयाने झपाटलेली माणसं फार काळ दूर राहू शकत नाहीत. एका घटनेमुळे बाळासाहेब सानप दूर गेले. पण त्यांच्या मनात अस्वस्थता होती. पुन्हा इथेच जायचं आहे, हे त्यांना माहिती होतं. पण आता गैरसमज दूर झाले आहेत. या काळात ना कुणी पक्षाबाहेर गेलं, ना कुणाचा उत्साह कमी झाला. बाळासाहेब हे राज्याच्या पातळीवरील नेते असल्याने त्यांना चांगली जबाबदारी दोन तीन दिवसात जाहीर करेन. नाशिक महापालिकेसोबतच देवयानी फरांदे, जयकुमार रावल, गिरीश महाजन यांच्या साथीने सानप यांनी उत्तर महाराष्ट्राचं राजकारण करावं, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER