शिवसेना पदाधिकारी लाड- आसगावकरांवर नाराज; काय आहे कारण?

Sanjay Pawar - Arun Lad - Jayant Asgaonkar

कोल्हापूर : पुणे (Pune) पदवीधरमधून अरुण लाड (Arun Lad) व शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर (Jayant Asgaonkar) विजयी झाले. आमदार झाले. याचा आम्हास आनंद आहे. मात्र या दोन्ही आमदारांनी शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांना अभाराचे फोन केला नाही. अशी नाराजी शिवसेना (Shiv Sena) जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांनी व्यक्त केली आहे.यावरून जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांचा पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

शिवसेना आघाडी धर्म म्हणून भविष्यात लाड आणि आसगावकर यांच्या मागे राहीन यात दुमत नाही. मात्र त्यांनी कोल्हापूरचा जिल्हाध्यक्ष म्हणून एक तरी फोन करायला हवा होता, अशी खंत जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER