शिवसेनेचा पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला ; वादात भाजप आमदाराची उडी

Eknath Patil - Chitra Wagh

मुंबई : कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना (Shiv Sena) तालुकाप्रमुख आणि विद्यमान विधानसभा संघटक एकनाथ पाटील (Eknath Patil) हे आपल्या सुनेच्या तोंडावर थुंकले व त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली, अशी तक्रार हर्षदा पाटील यांनी भाजप आमदारासोबत पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन केली. या घटनेची व्हिडिओ क्लिप पुरावा म्हणून त्यांनी सादर केला. याप्रकरणात भाजपाच्या (BJP) महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही उडी घेतली असून कारवाईची मागणी केली आहे. या घटनेवर एकनाथ पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे .

कल्याण ग्रामीण परिसरातील भोपर गावात राहणाऱ्या हर्षदा या एकनाथ पाटील यांच्या सूनबाई आहेत . एकनाथ हे हर्षदा यांच्या तोंडावर थुंकल्याचा त्यांचा आरोप असून, पुराव्यादाखल त्यांनी व्हिडिओ दाखवला. सासऱ्याकडून होत असलेल्या त्रासाची माहिती शिवसेनेच्या नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात यश आले नाही, असे हर्षदा यांचे म्हणणे आहे. पोलीसही एकनाथ यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेत नसल्याने अखेरीस हर्षदा यांनी डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे दाद मागितली. चव्हाण यांनी भाजप नगरसेविका रविना माळी यांच्यासह हर्षदा यांना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे पाठवले. हर्षदा पाटील यांची सादर केलेल्या व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई केली जाईल, असे पानसरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे चित्रा वाघ यांनीही ट्विट करुन व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता विकृतांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button