उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना शिवसेना (Shiv Sena) आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने (Congress) त्यांना उत्तर मुंबईतून उमेदवारीही दिली. परंतु त्यांचा पराभव झाला. मात्र अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र तरीदेखील काँग्रेसने त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. त्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार असाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे कळते .

महत्वाचे म्हणजे उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER