मोदींच्या बुलेट ट्रेनला शिवसेनेचा अडथळा; ठाणे मनपाने फेटाळला जागेचा प्रस्ताव

Uddhav Thackeray & Bullet Train & Modi

ठाणे : ठाण्यातून (Thane) जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) मार्गाला शिवसेनेने (Shivsena) विरोध केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या ऑनलाईन सभेत बुलेट ट्रेनविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. शीळ- डायघर व इतर गावांतून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या जागेचा प्रस्ताव सर्वपक्षीयांनी नामंजूर केल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. मेट्रोच्या कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेवरून केंद्र सरकार आणि ठाकरे सरकार यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पाला चाप लावण्याचे संकेत दिले होते. याचे प्रत्यंतर आता ठाण्यात येताना दिसत आहे. (Oppose for Bullet train project in Thane)

भाजपाची टीका

शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे सेना केंद्रातून इतर प्रकल्पांसाठी कटोऱ्यातून पैसे मागते आणि दुसरीकडे बुलेट ट्रेनसाठी विरोध दर्शवते, अशी टीका भाजपाचे गटनेते संजय वाघुले यांनी शिवसेनेवर टीका केली. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला आमचा पाठिंबा आहे, असे वाघुले म्हणालेत.

आक्षेप

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्राची जमीन जास्त आणि केवळ चारच स्टेशन महाराष्ट्रात अशी परिस्थिती असल्याचा आरोप आहे. मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर ही चार स्टेशन महाराष्ट्रात तर उर्वरित आठ  स्थानकं गुजरातमध्ये प्रस्तावित आहेत. यामध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश असेल. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच बुलेट ट्रेनचा जास्त फायदा असेल, असा आरोप अनेक पक्षांनी केला आहे.

वाढवण बंदर, ठाकरे सरकारचे दुसरे हत्यार

केंद्राकडून कांजूरमार्ग कारशेडच्या जमिनीवर दावा केल्यानंतर आता ठाकरे सरकारने केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजनांना विरोध करणे सुरू केले आहे. बुलेट ट्रेन आणि वाढवण बंदराला स्थानिक जनतेचा विरोध आहे. हा प्रकल्प जनतेला मारक असल्याचा आक्षेप घेऊन शिवसेना या बंदराला विरोध करते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER