शिवसेना काँग्रेससमोर नमली : आशिष शेलारांची शिवसेनेवर बोचरी टीका

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेससोबत सत्तेत आलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेवर बोचरी टीका करत म्हटले आहे की ‘झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकली,

“नाही धार “सच्चाई”कारांच्या शब्दांना आज दिसली “रोखठोक”लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झालीछे..छे..झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!” असे ट्वीट आशिष शेलारांनी केले.