पवार-ठाकरे भेटीत खातेवाटपावर नवा फार्मुला; असे असणार ‘महाविकास आघाडी’च मंत्रिमंडळ?

mahavikasaghadi.jpg

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटल्यात जमा झाला आहे. गुरुवारी राजधानी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात ‘महाविकास आघाडी’चं सरकार स्थापन करण्यासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नियोजित बैठक होती. मात्र या नियोजित बैठकीआधी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेला सोबत घेऊन शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओक या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा पोहोचले. जवळपास तास भर चाललेल्या या बैठकीत नव्या सरकारच्या खातेवाटपावर अंतिम निर्णय झाल्याची माहिती पुढे येत आहे.

मध्यरात्री पवार-ठाकरे भेट, चर्चा सकारात्मक; आजच सत्ता स्थापनेचा दावा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता महाविकासआघाडीचा नवा फॉर्म्युला पुढे येत आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला ११ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रीपदं, राष्ट्रवादी काँग्रेसला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रीपदं तर काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला २७ महामंडळे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी २५ महामंडळे मिळणार आहेत. तर सिद्धिविनायक ट्रस्टचा कारभार शिवसेनेकडे आणि शिर्डी संस्थानचा कारभार काँग्रेस आणि राष्ट्रवादी बघणार आहेत.