ज्यांचं तोंड फाटलेलं त्यांना उत्तर देण्याची गरज नाही; शिवसेना खासदाराने नितेश राणेंना झापलं

Nitesh Rane - Vinayak Raut

रत्नागिरी : मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) मंत्र्यांवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप होताना दिसत आहे. १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर आता निलंबित एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) याच्या लेटरबॉम्बमुळे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) गोत्यात आले आहेत.

भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सचिन वाझे आणि अनिल परब यांचे संवाद एनआयएकडे आहेत, असा दावा केला. त्यांच्या याच दाव्यानंतर आता शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणे यांना चांगलंच फटकारलं आहे. त्यांनी ज्यांचं तोंड फाटलेलं आहे, त्यांना उत्तर द्यायची गरज नाही, अशा टोकदार शब्दांत राणेंवर टीका केली आहे. अनिल परब हे पूर्णपणे निर्दोष आहेत. त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भूमिका स्पष्ट करताना त्यांच्यात आत्मविश्वास दिसत होता. त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. एनआयए किंवा सीबीआय काय करणार आहे, हे भाजपचे लोक अगोदरच बोलून मोकळे होतात. या यंत्रणांचा वापर भाजप कसा करतेय, हे देशातल्या लोकांना माहिती झालं आहे. अनिल परब हे एनआयएला संपूर्ण सहकार्य करतील, असं विनायक राऊत म्हणाले. तसेच सचिन वाझे आणि अनिल परब यांच्यातील संवाद एनआयएकडे आहेत, या नितेश राणे यांच्या दाव्याबद्दल बोलताना, ज्यांचं तोंड फाटलेलं आहे त्यांना मला उत्तर देण्याची गरज नाही, असेसुद्धा विनायक राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांची नाही तर उद्धव ठाकरेंची शपथ घेऊन सांगा लसीचा किती पुरवठा झाला? – नितेश राणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button