कई तूफानों का रुख मोड चुका हूँ ! ; संजय राऊतांचा विरोधकांना इशारा

Sanjay Raut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही कंगनावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली . यानंतर राऊत यांच्यावर विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

याप्रकरणी संजय राऊत यांनी आज एक सूचक ट्विट करत विरोधकांना इशारा दिला आहे . मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना,पहिले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूँ… !असे ट्विट राऊत यांनी केले आहे.

दरम्यान संजय राऊतांनी जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी देखील तिची माफी मागण्याचा विचार करेन असं म्हटले आहे. कंगनाने मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं, हेच अहमदाबादबद्दल बोलायची तिची हिंमत आहेत का?? असा सवालही यावेळी राऊतांनी केला.

ही बातमी पण वाचा : संजय राऊत यांनी माफी मागावी ; दिया मिर्झाने केली कंगना रणौतची पाठराखण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER