महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यापेक्षा यूपीसाठी करा- संजय राऊत

Sanjay Raut-Ramdas Athawale

मुंबई : उत्तरप्रदेशातील (UP news) हाथरसमधील बलात्काराच्या घटनेवरून देशात संतापाची लाट उसळली आहे. हाथरसमध्ये १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपसह (BJP) रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यावर निशाणा साधला आहे.

उत्तरप्रदेशात घडलेली ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. उत्तरप्रदेशला ‘रामराज्य’ म्हटलं जातं. तिथं एका मुलीवर बलात्कार, खून होतो आणि आरोपींना वाचवलं जातं. इतरत्र मात्र कुणाच्या घरावरील कौले जरी उडवली तरी अन्याय म्हटलं जातं. आता कुठं आहेत रामदास आठवले? एखाद्या गरीब मुलीला न्याय मिळू नये का? त्यासाठी एखादी अभिनेत्री किंवा एखादा सेलिब्रेटी हवा का? हाथरसमधील ती निर्भया आमची कोणी लागत नाही का? अशा शब्दांत संजय राऊत यांनी रामदास आठवले यांचा समाचार घेतला.

“बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या वांद्रे येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामावर मुंबई महापालिकेनं कारवाई केली होती. त्यानंतर आठवले यांनी कंगनाची भेट घेऊन तिला सर्वतोपरी मदतीचे आश्वासनदेखील दिलं होतं. त्यानंतर रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी रामदास आठवले यांच्यावर सडकून टीका केली.

अनुसूचित जमातीतील मुलीवर अत्याचार होतात आणि कोणीही लढत नाही. काहीही बोलत नाही. आम्ही शांतपणे याकडे पाहतोय. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आवाज उठवू. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांनी आता यूपीबाबत ती मागणी करावी. ” असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER