‘शिवसेना खासदाराने करुन दाखवले’, भाजप-शिवसेना आमदारामध्ये दिलजमाई

Maharashtra Today

बुलडाणा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून बुलढाण्यात शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीतही रूपांतर झाले होते. अखेर जे दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना जमले नाही ते शिवसेनेच्या खासदाराने करुन दाखवले. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि भाजप आमदार संजय कुटे(Sanjay Kute) यांच्‍यात पेटलेले युद्ध अखेर शांत झाले. भाजपचे आमदार कुटे यांनी हा वाद आमच्‍यासाठी संपल्याचे फेसबुकच्या माध्यमातून जाहीर केले. तर, दुपारी खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav)यांनीही शिवसेनेकडून हा विषय संपल्याचे जाहीर केले.

भविष्यात असे वाद निर्माण होऊ नये, कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत यासाठी सर्वांनी शब्‍द मोजून मापून वापरले पाहिजेत, अश्या सूचना प्रतापराव जाधव यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

सध्या कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. आपल्या कुणा जवळच्‍या नातेवाईकाला, व्‍यक्‍तीला, कार्यकर्त्याला बेड मिळत नाही, ऑक्सिजन सिलिंडर उपलब्‍ध होत नाही, इंजेक्‍शन उपलब्‍ध होत नाही, त्‍यामुळे जीवाची घालमेल होते. त्‍यातून अपशब्‍दही निघतो, मात्र त्याला महत्व देण्याची गरज नाही. त्‍यामागील भावना समजून घेतल्या पाहिजेत. सध्या वाद घालण्याचे दिवस नाही. माझी सर्वांना विनंती आहे की जिल्ह्यात शांतता राखली पाहिजे. आमच्‍यासाठी हा विषय आता संपलेला आहे. ज्‍याला कुणाला शक्‍ती प्रदर्शन करायचे असेल त्‍यांनी आपली शक्‍ती कोरोनाविरोधात लढण्यासाठी उपोयोगात आणावी. आपापल्या लोकांचे, कार्यकर्त्यांचे, नातेवाइकांचे जीव वाचविण्यात शक्‍ती खर्च करावी. शक्‍ती प्रदर्शन करण्याची गरज सध्याच्या संकटकाळात तरी नाही, असे म्हणत खासदार जाधव यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.

जिल्हाधिकारी यांना कोरोना संदर्भातील विविध मागण्याचे निवेदन महाविकास आघाडीने दिले. तर, पोलीस अधीक्षक यांच्याकडे जाऊन भाजप- शिवसेना वादाच्या संदर्भात भेट घेऊन चर्चा केलीय. वादामध्ये जे दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीनं केली.

वादाला कधी सुरुवात?

“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शनिवारी केले होते. गायकवाड यांची उतरली नसल्याने त्यांनी अश्लील भाषेत टीका केलीय, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते. आता संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे. यानंतर बुलडाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला होता. यानंतर भाजपच्या माजी आमदारांना मारहाण झाली होती. शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार संजय कुटे यांनी परस्परांवर टीकास्त्र सोडलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button