शिवसेना खासदार संतापले; राष्ट्रवादी आणि काँग्रेस मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Sadashiv Lokhande - NCP - Congress

अहमदनगर : राज्यात तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून अनेकदा नाराजीनाट्य उघडकीस आले. मात्र आता शिवसेनेच्या (Shiv Sena) खासदाराने थेट राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) मंत्र्यांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी आज  एकत्रित अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची पाहणी केली. मात्र आपल्या लोकसभा मतदारसंघात पाहणी दौरा असूनही निमंत्रण दिले नसल्याने शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) चांगलेच संतापले.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आज निळवंडे धरणाच्या कामांची पाहणी करताना सेनेच्या खासदाराला डावलल्याचा आरोप लोखंडे यांनी केला आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी कोरोनाचे वेगळे नियम आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लोखंडे यांनी पोलिसांकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या पाच दशकांपासून ज्या निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट बघत आहेत त्या धरणाच्या कालव्यांचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कालव्याची पाहणी करताना निधी कमी पडणार अशी ग्वाही दिली. मात्र या पाहणी दरम्यान आपल्या मतदारसंघातील पाहणी दौऱ्याचं  निमंत्रण नसल्यानं लोखंडे यांनी नाराजी व्यक्त केली. आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. भाजप युतीच्या काळात या धरणाच्या कामाला गती मिळाली होती.

त्यामुळे आज हे काम पूर्णत्वास जात आहे. मात्र यात राजकारण न आणता सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची गरज असताना आज काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते कार्यक्रम घेत आहेत आणि मला निमंत्रण दिले जात नाही हे दुर्दैवी असल्याचं खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांनी अधिकाऱ्यांना विचारले असता जमावबंदी आदेशामुळे कोणताही कार्यक्रम करता येणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आज तीन मंत्री येतात आणि कार्यक्रम उरकून घेतात, त्यांना काय वेगळे कायदे आहेत का, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button