केंद्राच्या कपटीपणामुळे ऑक्सिजनच्या रेल्वगाड्या खोळंबल्या; शिवसेना खासदाराचा आरोप

Arvind Sawant

मुंबई : देशात सध्या कोरोनाचे (Corona) भयानक रूप बघायला मिळत आहे. अशातच केंद्र सरकारने (Central Government) कपटनीतीचे राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन (Oxygen) आणायला गेलेल्या रेल्वेगाड्यांना रेल्वे विभाग अजूनही फिरवत आहे, असा आरोप शिवसेना (Shiv Sena) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केला.

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केला. केंद्र सरकारमुळेच महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्स्प्रेस येण्यासाठी उशीर होत आहे. कळंबोलीहून ऑक्सिजन एक्सप्रेस १९ तारखेला निघाली तरी २४ तासांनंतर अकोला स्थानकावरच उभी होती. आता ही एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. म्हणजे गाडीला जायचं विशाखापट्टणमला आहे आणि ती फिरतेय कुठे माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन पोहचण्याला अजून तीन दिवस लागतील. या ऑक्सिजन एक्स्प्रेससाठी ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. पण, तसं होताना दिसत नाही. ही क्रूर आणि कपटनीती आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या प्रकरणी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली.

कोरोनाच्या संकटकाळात राज्यात विरोधी पक्षाकडून राजकारण केलं जात आहे. हे राजकारण गरिबांच्या जीवाशी खेळणारं आहे. राज्याने केलेले चांगले काम दिसू नये, यासाठी घाणेरड्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. प्राण कंठाशी आले तरी रेल्वेमार्फत ऑक्सिजन पोहचेल का माहिती नाही. भिलाई प्लांटमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवण्याचे ठरले होते. मात्र, आता आम्ही फक्त ४० टक्केच ऑक्सिजन पुरवू शकतो, असे प्लांटच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी हे सगळं सुरू आहे. कुडमुडे ज्योतिषी तारखांवर तारखा सांगत आहेत, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यातील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिथे ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण होत असेल तो दूर केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे लॉकडाऊन (Lockdown) हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगत आहेत. मात्र, अजून बंगालच्या निवडणुका संपायच्या आहेत. या निवडणुका झाल्या की, पंतप्रधान मोदी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करतील, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button