महिलांबाबत केंद्र सरकारचे वर्तन प्रतिगामी, ‘सामना’तून टीकास्त्र

Women Indian Army

मुंबई : केंद्र सरकारचे वर्तन महिलांबाबत प्रतिगामी असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने आज बुधवारच्या आपल्या अग्रलेखातून केली आहे.

शौर्य आणि त्याग या संदर्भात पुरुष असो वा स्त्री यांच्यात लिंगभेद करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने भारतीय लष्करातील कायमस्वरूपी पोस्टिंगच्या

संदर्भात सोमवारी दिला. या निकालावरून ‘हिरकण्यांचा विजय’ या अग्रलेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.हा देशातील स्त्रीशक्तीचा विजय असल्याचे वर्णन ‘सामना’ने केले आहे.

शिवभक्तांच्या साक्षीने शिवनेरीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ‘ऑन द स्पॉट’ फैसला

सदर निर्णय ऐतिहासिक असून, यापुढे भारतीय लष्करात महिलादेखील नेतृत्व करतील, असा विश्वासही अग्रलेखात व्यक्त करण्यात आला आहे.

सरकारने महिलांची शारीरिक क्षमता आणि मानसिकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, ही बाब धक्कादायक होती. सरकारला न्यायालयानेच धक्का दिला असून, सरकारची भूमिका महिलांचा थेट अपमान करणारी ठरते. पुरोगामीपणाच्या आवरणातील केंद्र सरकारचे हे वर्तन प्रतिगामी असल्याचे ‘सामना’ने म्हटले आहे.

स्त्री शक्तीचा गौरव करताना शिवसेनेच्या मुखपत्राने यावेळी झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी चेनम्मा, अहल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई. कॅ. लक्ष्मी सेहगल, इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वाचे दाखले दिले आहेत.

आपल्या दृष्टिकोनात बदल करावा, असा सल्लाही या अग्रलेखात ‘सामना’ने केंद्र सरकारला दिला आहे.