कृषी कायदे रद्द करा ; शिवसेनेचा ‘मोदी हटाव, किसान बचाव’ मोर्चा सुरू

Shivsena

मुंबई : केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी कोल्हापुरात शिवसेनेने (Shivsena) ‘मोदी हटाव, किसान बचाव’ मोर्चा सुरू केला. खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोदी हटाव देश बचाव, इडा पीडा टळो बळीराजाचे राज्य येवो, असा नारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.

केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. शेतकरी जगला तर आपण जगू. आज शेतकऱ्यावर संकट आहे. या संकटातून बाहेर काढण्याऐवजी मोदी सरकार शेतकऱ्याला उद्ध्वस्त करत आहेत. त्यामुळे नव्याने करण्यात आलेले कायदे रद्द झालेच पाहिजे, अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या कायद्यांविरोधात अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सरकार शेतकरीविरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत थेट राजीनामा दिला. तर, एवढ्या वर्षांची मैत्री असलेला शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला.

शिवसेनेनेही आता या कायद्याविरोधात एल्गार पुकारलेला दिसत आहे. कोल्हापुरातून याची सुरुवात झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER