शरद पवारांच्या दौऱ्यात शिवसेनेच्या आमदाराची सोनसाखळी लंपास !

Sharad Pawar - Dnyanraj Chougule

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या पूर-पावसाने या भागात नुकसान झालेल्या भागाची पाहाणी करत आहे. मात्र, या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट आहे! उमरगा-लोहाराचे शिवसेना  (Shiv Sena) आमदार ज्ञानराज चौघुले (Dnyanraj Chougule) यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरानी लांबवली! इतरही चोऱ्या झाल्याची माहिती आहे.

परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. तुळजापूरमध्ये पाहणी केल्यानंतर, येत्या १० दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेईन आणि महाराष्ट्राला केंद्राने मदत करावी’, अशी मागणी करेन, असे शरद पवार यांनी सांगितले.

दौऱ्याच्या सुरुवातीला लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये पवारांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या. खचून न जाता या संकटाचा धीराने सामना करावा लागेल, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाच्या (Corona) अनुषंगाने सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगितले जाते आहे. मात्र, हा नियम शरद पवार यांच्या समोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पायदळी तुडवत होते. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सोशल डिस्टन्स ठेवण्याची सूचना केली. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर सुरक्षारक्षक आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दूर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER